Home पुणे फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, थायलंड येथील दोन महिलांची सुटका

फ्लॅटमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, थायलंड येथील दोन महिलांची सुटका

Breaking News | Pune Crime:  फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश.

Flat prostitution busted, two women freed in Thailand

पुणे :  कोरेगाव पार्क परिसरातील फ्लॅटमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा कोरेगाव पार्क पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत थायलंड येथील दोन महिलांची सुटका करुन महिला स्पा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.15) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क परिसरातील साऊथ मेन रोड येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नंबर आठ येथे केली आहे.

मूकडा गेटाईसॉन्ग  हीच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस हवालदार रईसा समीर बेग (वय-38) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कोरेगाव पार्क येथील सुखवाणी क्लासिक मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली.

त्यानंतर छापा टाकून थायलंड येथील दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून थायलंड येथून ब्युटी पार्लरचे काम करण्याच्या बहाण्याने बोलावून घेऊन तिच्या फ्लॅटमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होती. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे चेतन मोरे करीत आहेत.

Web Title: Flat prostitution busted, two women freed in Thailand

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here