संगमनेर: चाऱ्यातून विषबाधा; १९ शेळ्यांचा मृत्यू
Breaking News | Sangamner: अन्नातून विषबाधा झाल्याने १९ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
घारगाव : अन्नातून विषबाधा झाल्याने १९ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील माळवाडी (बोटा) येथे मंगळवारी (दि. १२) घडली. या घटनेत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सबाजी सोनबा खंडागळे (रा. माळवाडी, बोटा) हे घरापासून काही अंतरावर बाजूला असलेल्या डोंगर भागात शेळ्या चारत होते. यावेळी शेळ्यांच्या खाण्यात काहीतरी आल्याने १९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शेतकऱ्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबतची माहिती अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांना समजताच त्यांनी खंडागळे कुटुंबाची भेट घेत मदतीचे आवाहन केले.
Web Title: Fodder poisoning 19 goats died
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study