Home अमरावती बळजबरीतून गर्भधारणा, १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

बळजबरीतून गर्भधारणा, १६ वर्षीय मुलीची आत्महत्या

Breaking News | Amravati Crime: १७ वर्षीय मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा.

Forced pregnancy, 16-year-old girl commits suicide

अमरावती : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील १६ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली. एका १७ वर्षीय मुलाने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. त्यातून तिला गर्भधारणा झाली. त्यामुळेच तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने नोंदविली. त्याआधारे गाडगेनगर पोलिसांनी दि. २९ मे रोजी रात्री संबंधित विधिसंघर्षित बालकाविरुद्ध बलात्कार, पोक्सो व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.

तो बालक मृत मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या परिचित आहे. तक्रारीनुसार, मुलगी व १७ वर्षीय मुलाचे अलीकडे वादविवाद सुरू होते. दि. २८ मे रोजी रात्री ८ वाजता मुलीची आई कॅटरिंगच्या कामासाठी एका लॉनमध्ये होती. त्यावेळी मुलीने तिच्या आईला फोन केला व सांगितले की, मला त्या मुलाच्या आईने तिच्या घरी बोलावले आहे.

त्यामुळे मी तिथे जात आहे. काही वेळानंतर घरातील बाथरूममध्ये मुलगी गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. दि. २९ मे रोजी तिचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

Breaking News: Forced pregnancy, 16-year-old girl commits suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here