पुणे हादरले ! जबरदस्तीने पार्टीत दारु पाजून हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार
Crime News : एका तरुणीला पार्टीत जबरदस्तीने दारू पाजून तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार (Raped) केल्याची घटना समोर आली आहे.
पुणे : पुण्यात महिलांवरील अत्याच्याराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात पार्टीसाठी गेलेल्या एका तरुणीला जबरदस्तीने दारू पाजून तिला हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीचे नग्न अवस्थेतील फोटो काढून ती व्हायरल करण्याची देखील धमकी तरुणीला आरोपी तरुणाने दिली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन एरवाढ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अभिषेक सत्तुजी टिक्कल या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२२ मध्ये जुलै महिन्यात घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या तरुणीला जुलै २०२२ मध्ये विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये एका तरुणाने पार्टीसाठी बोलावून घेतले. आरोपीने पीडित तरुणीला पार्टीत जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. दरम्यान, तिला दारूची नशा चढली. यानंतर आरोपीने तरुणीला हॉटेल लेमन ट्री येथे नेत तिच्यावर बलात्कार केला. नशेच्या अवस्थेत तिचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ काढले. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यामुळे त्रस्त झालेल्या तरुणीने थेट विमाननगर पोलिस ठाणे गाठत आरोपी तरुणाबद्दल तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांमुळे पुण्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Web Title: Forced to drink alcohol at a party and raped
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App