अहिल्यानगर: माजी नगरसेवक 93 हजारांच्या रोकडसह पोलिसांच्या ताब्यात
Breaking News | Ahilyanagar: मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारीवरून शहरातील तोफखाना पोलिसांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक योगीराज गाडे यांना रात्री ताब्यात घेतले.
अहिल्यानगर: मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या तक्रारीवरून शहरातील तोफखाना पोलिसांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) माजी नगरसेवक योगीराज गाडे यांना रविवारी रात्री ताब्यात घेतले. या संदर्भात चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जात असल्याची माहिती तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी दिली.
माजी नगरसेवक योगिराज गाडे हे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे चिरंजीव आहेत. शहराच्या तारकपूर भागातील झुलेलाल मंदिर परिसरात योगीराज गाडे पैसे वाटप करत असल्याची माहिती निवडणूक अधिकार्यांच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पथक पोलिसांसह रात्री आठच्या सुमारास तेथे पोहोचले. त्यावेळेस त्यांना तेथे योगीराज गाडे व त्यांच्याकडे 93 हजारांची रोकड आढळली. गाडे व रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील चौकशी करून कारवाई केली जात असल्याचे पोलीस निरीक्षक कोकरे यांनी सांगितले.
अहिल्यानगर शहर मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार अभिषेक कळमकर यांच्या प्रचारात ठाकरे गटाचे माजी नगरसेवक गाडे सक्रिय आहेत. जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे हेही अपक्ष उमेदवार आहेत, मात्र त्यांनी कळमकर यांना पाठिंबा दिलेला आहे.
Web Title: Former corporator with cash of 93 thousand in police custody
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study