माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवणार नाही..कारण आले समोर
Breaking News | Loksabha Election: भाजप पक्षाकडून सुजय विखे यांच्या नावाचा विचार करीत नसल्याचा सूत्रांची माहिती समोर.
संगमनेर: अहमदनगरच्या संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील निवडणूक लढविणार नाहीत. सुजय विखे यांनी निवडणूक लढण्यासाठी तयारी दाखविली होती पण पक्षाकडून सुजय विखे यांच्या नावाचा विचार करीत नसल्याचा सूत्रांची माहिती समोर आली आहे. एकाच घरात दोन तिकेट नको म्हणून पक्षाचा निर्णय असल्याची सूत्रांची माहिती आहे. ही जागा महायुतीमध्ये शिवसेना गटाला असल्याने उमेदवार कोण अशी चर्चा सुरु होती. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरुद्ध निवडणूक लढण्याची तयारी होती.
एकाच घरात दोन तिकेट नको म्हणून सुजयच्या नावाचा विचार नाही अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान थोरात यांना राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र तथा नगर दक्षिणचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे आव्हान देणार असे बोलले जात होते. स्वतः सुजय विखे पाटील यांनीच संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र आता विजय विखे पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे खात्रीलायक वृत्त सूत्रांच्या माध्यमातून हाती आली आहे. एका प्रतिष्ठित वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार सुजय विखे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीयेत.
भारतीय जनता पक्ष सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा कुठलाही विचार करत नसल्याचे म्हटले जात आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची ही जागा महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाकडे जाते. यामुळे ही जागा भाजपाला मिळणे कठीण आहे. तसेच भारतीय जनता पक्ष एकाच कुटुंबात दोन व्यक्तींना उमेदवारी देत नाही.
पक्षाची ही भूमिका असल्यानेही सुजय विखे पाटील यांना विधानसभेसाठी तिकीट दिले जाणार नाही असे म्हटले जात आहे. एकंदरीत सुजय विखे पाटील यांची आगामी विधानसभा निवडणुक लढवण्याची इच्छा यंदा धुळीस मिळणार असे दिसत आहे.
Web Title: Former MP Sujay Vikhe Patil will not contest the elections
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study