Home क्राईम संगमनेरात नाशिक महामार्गावर चार मद्यपींची हाणामारी

संगमनेरात नाशिक महामार्गावर चार मद्यपींची हाणामारी

Four drunkards fight on Nashik highway Sangamner

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरात नाशिक पुणे महामार्गावर ऐश्वर्या पेट्रोल पंपाजवळ चार मद्यपिंनी दारूच्या नशेत हाणामारी करीत धिंगाणा घातल्याचा प्रकार रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काल दुपारी मंत्री महोदयांची वाहने सदर रस्त्याने जात असताना चार मद्यपींची हाणामारी सुरु होती. त्यावेळी सदर वाहनातील सुरक्षारक्षकांनी याबाबत शहर पोलिसांना कळविले. त्यानंतर तातडीने शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

याप्रकरणी सागर चंदू पवार रा. घुलेवाडी, अफरोज सैफ शेख रा. कोतूळ, प्रथमेश राउत व बाबू पवार यांच्या विरोधात पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर पवार व अफरोज शेख यांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस नाईक पालवे हे करीत आहे.  

Web Title: Four drunkards fight on Nashik highway Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here