Home चंद्रपूर Accident: गायीला वाचविण्याच्या नादात बोलेरोचा भीषण अपघात, चार ठार

Accident: गायीला वाचविण्याच्या नादात बोलेरोचा भीषण अपघात, चार ठार

Chandarapur Accident News:  स्टेरिंग राळ तुटला आणि गाडी तिथे उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळून अपघात, चार ठार.

Four killed in bolero accident while trying to save cow

चंद्रपूर: मध्यरात्रीच्या सुमारास बोलेरोने प्रवास करणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाला. चंद्रपूर-गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील किसान नगर येथे हा अपघात झाला. यामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत तर, १ जण जखमी झाला आहे. रस्त्यावर बसलेल्या गायीला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

या अपघातात पंकज किशोर बागडे (वय 26), रा. गडचिरोली, अनुप रमेश ताडूलवार (वय 35 वर्ष), रा. विहीरगाव ता. सावली, महेश्ववरी अनुप ताडूलवार (वय 24 वर्ष) रा. विहीरगाव, मनोज अजय तीर्थगिरीवार (वय 29), रा. ताडगाव ता. भामरागड जिल्हा गडचिरोली हे मयत झाले आहेत तर सुरेंद्र हरेंद्र मसराम (वय 23 वर्ष) रा. चिखली ता. सावली. जखमी झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  किसानगर) येथे मुख्य मार्गावर रस्त्यातच गाय बसलेली होती. बोलेरो गाडी भरधाव वेगात होती. रस्त्यात अचानक गाय बसलेली दिसल्याने गायीला वाचविण्यासाठी चालकाने जोरात स्टेअरिंग फिरवली, या प्रयत्नात स्टेरिंग राळ तुटला आणि गाडी तिथे उभ्या असलेल्या ट्रकवर जोरदार आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की, गाडीत बसलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत झालेल्यांमध्ये ३ पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, तर पाचवा व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातीची माहिती मिळताच, सावलीचे ठाणेदार आशिष बोरकर हे घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Four killed in bolero accident while trying to save cow

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here