Breaking News | Pune Crime: तरुणीचा विश्वास संपादन करून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले अन पिडीत मुलीला अन तिच्या आईला मारहाण करून चार लाख उकळले.
पुणे: तरुणीचा विश्वास संपादन करुन तिला भेटण्यासाठी बोलावून घेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिला मारहाण करुन पीडित मुलीकडून व आईकडून चार लाख रुपये उकळले. हा प्रकार आंबेगाव पठार येथे सन 2019 ते मे 2024 या कालावधीत वारंवार घडला आहे. याप्रकरणी सातारा येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी 29 वर्षीय तरुणीने शुक्रवारी (दि.10) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सुधीर विलास काळेल (वय-35 रा. जांभूळणी, पो. पुळकोटी, ता. माण जि. सातारा) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 354(सी), 323, 504, 506 सह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपीने पीडित मुलीला आंबेगाव पठार येथे बोलावून घेतले. तिचा विश्वास संपादन करुन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. तसेच शारीरिक संबंध ठेवताना त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ काढला. अश्लील व्हिडीओ फिर्यादी यांच्या मैत्रिणीला दाखवला. तसेच तिला शिवीगाळ व मारहाण करुन फिर्यादी व त्यांच्या आईकडून चार लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने करीत आहेत.
Web Title: Four lakhs were stolen by raping a young woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study