Corona: राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता, आरोग्यमंत्री
जालना: गेल्या काही दिवसांपासून कोरोना (Corona) रुग्णसंख्येत घट होताना दिसून येत आहे. त्यामुळे अनेकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉनची लाट सातत्याने वाढत आहे, चीनमधील काही शहरांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन आठवडे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत. चीन आपला शेजारी असल्याने भारतानेही काळजी घेणे आवश्यक आहे.
त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेनंतर चौथी लाट येणार का असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. इतर देशात रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने महाराष्ट्रात सध्या मास्कमुक्ती नाहीच असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. तिसरी लाट ओसरत आहे. काही ठिकाणी संख्या ० वर आली आहे. मात्र या भ्रमात न राहता केंद्र सरकारकडून राज्य सरकारला पत्र प्राप्त झालं आहे. त्यानुसार कोरोनाच्या नियमांचे पालन राज्य सरकार करत आहे. त्यामुळं राज्यात सध्या मास्क मुक्ती नाहीच असं टोपे सांगितले आहे. राज्यात 90 टक्के लसीकरण पूर्ण झालं असून नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन टोपे यांनी यावेळी केलं आहे.
Web Title: fourth wave of corona is expected in Maharashtra