संगमनेरात प्रसिद्ध उद्योजकाच्या नावाने फसवणूक
Breaking News | Sangamner Crime: संगमनेरमधील प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी फोनवर बोलत असल्याचे सांगून अशात आरोपीने तत्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न.
संगमनेर: संगमनेरमधील प्रसिद्ध उद्योजक राजेश मालपाणी फोनवर बोलत असल्याचे सांगून अशात आरोपीने तत्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगून कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न नुकताच उघडकीस आला. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात नव्याने बदललेल्या भारतीय न्याय संहिता कायद्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारासंदर्भात राजेशप्रसाद दौलतप्रसाद दुबे यांनी रात्री शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी साडेनऊ वाजता मालपाणी हाऊसमध्ये असताना अज्ञात व्यक्तीने एका मोबाईल क्रमांकावरून दुबे यांना फोन करत फोनवर राजेश मालपाणी असल्याचे भासवले व तात्काळ ४९ लाख ६० हजार ५०३ रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र कर्मचाऱ्याला संशय आल्याने त्यांनी कोणतेही पैसे पाठविले नाही, त्यानंतर उद्योगपती मालपाणी यांच्या नावावर कोणीतरी आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही तक्रार दाखल करण्यात आली.
फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी नवीन बदललेल्या कायद्यानुसार ३१८/४६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा शोध घेतला जात आहेपोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास भान्सी याप्रकरणी पुढील तपास करत आहे.
Web Title: Fraud in the name of a famous businessman in Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study