मैत्रिणीनेच मैत्रिणीला दारू पाजून केले मित्राच्या हवाली, अत्याचार अन…
Breaking News | Thane Crime: बदलापूरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.
ठाणे: बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेले अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच आता बदलापूरमध्ये 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात मैत्रिणीनेच मैत्रिणीचा घात केल्याचे दिसून येत आहे.
पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बीअर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर तिला रिक्षाचालक मित्राकडे सोपवले. या नराधमाने तिच्यावर अत्याचार केले. पोलिसांनी पीडितेची मैत्रीण आणि संबंधित रिक्षाचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडित तरुणी मुंबईला राहणारी आहे. ती 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. त्यावेळी बदलापूरच्या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतले. तिघांनी मद्यपान केले. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्ध हरपली. त्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक जाधव याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिली. पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर हा प्रकार तिच्या लक्षात आला.
पीडित तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर अवघ्या बारा तासांत कारवाई करून रिक्षाचालक जाधव याला खरवई परिसरातून अटक केली. पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र, अखेर त्याला शोधून काढत अटक करण्यात आली. या कृत्यात सहभागी असणाऱ्या त्याच्या मैत्रिणीलाही पोलिसांनी अटक केली आहे.
Web Title: friend made the friend drink alcohol and handed it over to the friend, abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News