मैत्रीण दुसऱ्याबरोबर फिरताना दिसली अन् मित्राने थेट….. धक्कादायक घटना
Breaking News | Pune Crime: दुसऱ्यासोबतच तुझा जाण्याचा संबंध काय ? अशी विचारणा करत तिला जबर मारहाण करून जबडा फ्रॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुणे: मैत्रिण दुसर्यासोबत फिरताना दिसल्यानंतर चिडलेल्या मित्राने तिला दुसऱ्यासोबतच तुझा जाण्याचा संबंध काय ? अशी विचारणा करत तिला जबर मारहाण करून जबडा फ्रॅक्चर केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर येथील मॉडल कॉलनी येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी रोहन जग्गन्नाथ कदम (वय २७, रा. भैरवनाथ तालीम चौक, गणपती मंदीराच्या गल्लीत, कोंढवा खुर्द) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी येथे राहणार्या २३ वर्षीय तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरूणी आणि रोहन कदम हे मित्र मैत्रीण आहेत. परंतु, दिवाळीपासून ते काही कारणावरून एकमेकांशी बोलत नव्हते. दोन दिवसांपुर्वी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास तरूणी त्याच्या दुसऱ्या एका मित्रासोबत दुचाकीवर जात असताना रोहन याने पाहिले. याचवेळी रोहनने तिला थांबवुन तु कोठे चालली आहेस, अशी विचारणा केली. दुसर्या सोबत फिरण्यास जाण्याचा तुझा काय सबंध आहे ? असे म्हणत वाद घातला. तसेच, त्याने हाताने बुक्यांनी चेहर्यावर गंभीर मारहाण केली. या मारहाणीत तरूणीचा जबडा फ्रॅक्चर झाला आहे. यानंतर तरुणीने पोलिसांकडे त्याची तक्रार दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.
Web Title: friend was seen walking with someone else and the friend directly
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study