महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या उद्दिष्ट व कामकाजाबाबत चर्चा
बॉयलर अटेंडंट कामगारांचा सर्वांगीण विकास करणे हा मुळ उद्देश.
मुंबई: महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या उद्दिष्ट व कामकाजाबाबत चर्चा मंगळवार दि. २६ जुलै रोजी दुपारी ३.०० वाजता कामगार भवन सातवा मजला वांद्रे कुर्ला संकुल वांद्रे (पूर्व) मुंबई बाष्पके महाराष्ट्र राज्य सातवा मजला बाष्पके ऑफिसमध्ये पार पडली.
यावेळी उपस्थित मा.श्री. ध. प्र. अंतापूरकर साहेब, संचालक बाष्पक महाराष्ट्र राज्य, मा.श्री. ग.दा. वानखेडे साहेब, सह संचालक बाष्पक महाराष्ट्र राज्य, मा. श्री. वि.म. बारमाटे साहेब, उप संचालक बाष्पक महाराष्ट्र राज्य, मा.श्री. बं. भा. इंगळे साहेब, उप संचालक बाष्पक महाराष्ट्र राज्य, मा.श्री. एस. एस. कुंभार साहेब, उप संचालक बाष्पक महाराष्ट्र राज्य हे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या उद्दिष्ट व बॉयलर क्षेत्रांत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली.
यावेळी निवेदन देऊन बाष्पक क्षेत्रात कर्मचाऱ्यांचे धोरण तसेच वेगवेगळ्या विषयावर चर्चा झाली. यावेळी उपस्थित संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री अंकुश वाकचौरे सर, तसेच कोर कमिटी अध्यक्ष मा.शुक्लेश्वर वर्पे सर, कोर कमिटी उपाध्यक्ष मा. जी.एस.आगलावे साहेब उपस्थित होते.
बॉयलर अटेंडंट जनरल कामगार सेना संघटनेच्या उद्दिष्ट पुढीलप्रमाणे: बॉयलर अटेंडंट कामगारांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे हा मुळ उद्देश समोर ठेवण्यात आला आहे.
उद्दिष्टे:
- चर्चासत्राच्या माध्यमातून सर्व अटेंडंट ला बॉयलर विषयी माहिती पुरविणे.
- शक्य असेल तेव्हा कार्यशाळा आयोजित करणे.
- ते कुशल कामगार/इंजिनियर कसे बनतिल यासाठी प्रयत्न करणे. (छोट्या छोट्या कोर्सेची माहिती पुरविणे, वेगवेगळ्या फॅक्टरीच्या भेटी आयोजित करणे, विषया संबंधी असलेले साहित्य आणि पुस्तकांची माहिती देणे इत्यादी.)
- परिक्षा होण्याचा अंदाज /नक्की तारखा बॉयलर डिपार्टमेंट कडून मिळवून सर्वांना कळवित राहणे. त्यामुळे डिपार्टमेंट वरिल, ही माहिती पुरविण्याचा भार कमी होईल.
- परिक्षा फॉर्म भरण्यासाठी साठी आवश्यक ती मदत पुरविणे.
- तज्ञा कडून फॉर्म पडताळून घेणे. यामुळे फॉर्म बाद होण्याची शक्यता कमी होईल.
- अटेंडंटच्या रास्त अडचणी डिपार्टमेंटच्या नजरेस आणून देणे व नियमानुसार शक्य असल्यास तोडगा काढणे.
- नवीन जागा निघाल्यास ती माहिती सर्वांना कळविणे.
- अटेंडंट फंड उभा करून मेडिकल इमर्जंसी साठी गरजू सभासदांना मदत करणे.
- 10.सर्व बॉयलर अटेंडन्ट बंधू हे आपलेच आहेत त्यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव संघटनेकडून न करणे आणि बाहेरील कोणत्याच व्यक्ती कडून केला जाणार नाही याची काळजी घेणे.
- बॉयलर अटेंडन्ट बंधू कडे असलेले प्रमाणपत्र हे किती मोलाचे आहे हे सर्वांना समजावणे व त्या नुसार योग्य तो पगार आपल्या बंधूंना मिळवून देण्याचा प्रयत्न करणे.
- PF, gratuity आणि ESIC सारख्या महत्वाच्या सुविधा प्रत्येक बॉयलर अटेंडन्ट बंधूंना मिळवून देणे.
- बॉयलर अटेंडन्ट च्या कंपनी मधील अपघाती निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्याच्या मुलाला किंवा त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्ती ला कामावर रुजू करण्याचे प्रयत्न करणे. तसेच अपघाता नंतर लागणारा उपचार खर्च पूर्ण कंपनीनेच करावा या साठी आग्रही राहणे.
- बॉयलर अटेंडन्ट बंधूंच्या मेरिट मध्ये येणाऱ्या मुलांना कामगार निधीतून शिष्यवृत्ती देऊन आणि किंवा शिक्षणा साठी आर्थिक मदत करणे.
- महाराष्ट्रातील प्रमाणपत्र असलेल्या बॉयलर अटेंडन्टला नोकरी मध्ये पाहिले प्राधान्य देण्याचा आग्रह धरणे .
- महाराष्ट्रातील प्रत्येक बॉयलर अटेंडन्ट हा कंपनी रोल वर कायमस्वरूपी कामावर रुजू करावे यासाठी प्रयत्न शील राहणे. तसेच भविष्यात महाराष्ट्रातील कोणताच बॉयलर अटेंडन्ट हा बेरोजगार राहणार नाही त्या साठी नियोजन करणे.
- ही सर्व धेय्य धोरणे पूर्ण होण्यासाठी सर्व बॉयलर अटेंडंटची, कुटुंब app मध्ये सभासद नोंदणी करून संघटनेची ताकत वाढवणे.
- संघटनेत सामील झालेल्या सदस्यांवर कुठल्याही प्रकारची सदस्य फी किवा आर्थिक भार पडू न देणे.
Web Title: functioning of Maharashtra State Boiler Attendant General Kamgar Sena Sangathan