Home Crime News संगमनेर तालुक्यात फर्निचरचे दुकान फोडले

संगमनेर तालुक्यात फर्निचरचे दुकान फोडले

Furniture shop theft in Sangamner taluka

संगमनेर | Theft: साकुर चौफुलीजवळ फर्निचरचे दुकान फोडून चोरट्यांनी विविध कंपन्यांचे एल.इ.डी. टीव्ही चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उमरभैय्या गनीभाई मणियार रा. साकुर ता. संगमनेर यांनी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत माहिती अशी की, मणियार यांचे साकुर चौफुलीजवळ सना फर्निचर नावाचे दुकान आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा उचकटत सुमारे १ लाख ४७ हजार रुपये एलइडी टीव्ही चोरून नेले. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.डी. टकले हे करीत आहे.

Web Title: Furniture shop theft in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here