Home Crime News धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार

Raigad Gang Rape

Raigad Gang Rape : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. आता रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 10 जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर आता एकच खळबळ मजली आहे. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वाशी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिच्या दोन मित्रांनी तिच्यावर शारीरिक अत्याचार केले होते. ही माहिती त्यांच्या इतर मित्रांमध्ये पसरली आणि मग त्या मित्रांनी पीडित मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. पीडित मुलीला धमकी देत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 7 जणांना अटक केली आहे. तर अद्यापही तीन आरोपी फरार आहेत. या कृत्यात आणखी काही तरुणांचा समावेश असण्याचा संशयही पोलिसांना आहे. दरम्यान फरार असलेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार केव्हा थांबणार हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title : Gang rape of a minor girl by 10 persons in Raigad district

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here