अहिल्यानगर: घरात घुसून विवाहितेवर सामुहिक अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: एका विवाहितेवर (वय 18) चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने सामुहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना.
अहिल्यानगर: एका विवाहितेवर (वय 18) चार अनोळखी इसमांनी घरात घुसून जबरदस्तीने सामुहिक अत्याचार केल्याची गंभीर घटना केडगाव उपनगरात बुधवारी (18 जून) सकाळी घडली. पीडित विवाहितेवर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असून अत्याचार करणारे संशयित पसार झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी पीडितेने दिलेल्या जबाबावरून चार अनोळखी व्यक्तींविरोधात बुधवारी सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहिता आपल्या घरी पाण्याची मोटर लावत असताना, चार अनोळखी व्यक्ती काळ्या अॅक्सेस व लाल पल्सर दुचाकीवरून तिच्या घरासमोर आले. यातील एक संशयित आरोपीने विवाहितेच्या दिशेने धाव घेत तिला उचलून घरात घेऊन गेला व तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर इतर तीन संशयित आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला असल्याचे जबाबात म्हटले आहे. संशयितांनी लाल रंगाच्या टोप्या, मेहंदी रंगाचे मास्क व विविध रंगाचे कपडे परिधान केले होते. सर्व संशयित आरोपी अंदाजे 30 ते 35 वर्षे वयाचे असल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
दरम्यान, सदर गुन्ह्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर विभागाचे उपअधीक्षक अमोल भारती, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड, व तेजश्री थोरात यांनी घटनास्थळी व जिल्हा रूग्णालयात धाव घेतली. पीडितेचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी व रूग्णालयात धाव घेतली. पीडितेचा जबाबावरून संशयित आरोपींचे वर्णन पोलिसांच्या लक्ष्यात आले आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही व खबर्यांकडून माहिती घेण्याचे काम पोलीस करत आहेत. संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहे. काही संशयितांकडे चौकशी सुरू असल्याची माहिती उपअधीक्षक भारती यांनी दिली.
Breaking News: Gang rape of married woman after entering house