Home Crime News पूर्ववैमनस्यातून दोन गटांत Gang War; एकाचा मृत्यू

पूर्ववैमनस्यातून दोन गटांत Gang War; एकाचा मृत्यू

Nashik Gang War

Nashik Gang War : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात भर दिवसा गँगवारचा धुमाकूळ उडाला होता. पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झाला असून जखमीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेमुळे इगतपुरीत एकच खळबळ माजली आहे.

संबंधित घटनेमुळे इगतपुरीतील नागरिक हे दहशतीखाली आले आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेनंतर आता गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ देखील बंद करण्यात आली आहे. मात्र सदर घटनेप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. तर पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

गुन्हेगारांना पोलिसांची अथवा कायद्याची अजिबात भीती वाटत नाही का? असा प्रश्न येथील लोक करू लागले आहेत. संबंधित घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. भरदिवसा अशाप्रकारच्या घटना तरी कशा घडू शकतात? असा प्रश्न त्यांना सतावतोय. आरोपी इतक्या भयानक पद्धतीने एकमेकांना भिडतात त्यावेळी कुणी सर्वसामान्य तिथे आजूबाजूला असला तर त्याचाही जीव घ्यायला ते मागेपुढे बघणार नाहीत, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना समोरं जावं लागलं. त्यात आता आणखी गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही मनस्तापाची वेळ आली आहे. दरम्यान, पोलीसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Web Title : Gang war in Nashik district due to prejudice; Murder of one

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here