Home Ahmednagar Live News अहमदनगर: कारमधून होतेय गांजाची वाहतूक, पाच किलो गांजा जप्त

अहमदनगर: कारमधून होतेय गांजाची वाहतूक, पाच किलो गांजा जप्त

Ahmednagar News: पाथर्डी रोडवर कारमधून होतेय गांजाची वाहतूक पाच किलो गांजा जप्त (seized), कारच्या डिक्कीतील पांढऱ्या रंगाच्या तळवाटात ४ किलो ९५५ ग्रॅम ओला व सुका गांजा.

Ganja is being transported by car, five kg of ganja seized

अहमदनगर : नगर-पाथर्डी रस्त्यावर सापळा लावून भिंगार कॅम्प पोलिसांनी कारमधून पाच किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी आला. गुरुवारी (दि.२६) केली.

चालक वसीम मुजाहीद शेख (३४, रा. बेलेश्वर कॉलनी, विजय लाईन भिंगार) व अजय उफ सोनू रामचंद मुदलीयार (३२, रा. सिटीझन कॉलनी, भिंगार) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाथर्डी येथून कारमधून दोघेजण गांजा घेऊन येत आहेत, अशी माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्याआधारे भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नगर- पाथर्डी रस्त्यावर सापळा लावला असता कार (एमएच १२ जेसी ८४७१) थांबवून झडती घेतली असता कारच्या डिक्कीतील पांढऱ्या रंगाच्या तळवाटात ४ किलो ९५५ ग्रॅम ओला व सुका गांजा आढळून आला. 

पोलिसांनी चालकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा गांजा, मोबाइल, जप्त केले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक किरण साळुंके, सहायक फौजदार रमेश वराट, कैलास सोनार, राजू वैरागरक, पोलिस हेड कॉन्स्टेबल अजय नगरे, गोविंद गोल्हार, विलास गारुडकर आदींच्या पथकाने केली.

Web Title: Ganja is being transported by car, five kg of ganja seized

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here