संगमनेर तालुक्यातून गांजा जप्त; पोलिसांचा छापा
Breaking News | Sangamner: गांजा विक्री करणाऱ्या एका ठिकाणावर तालुका पोलिसांनी छापा टाकून ९०० ग्रॅम गांजा जप्त.
संगमनेर: तालुक्यातील निमज येथे गांजा विक्री करणाऱ्या एका ठिकाणावर तालुका पोलिसांनी छापा टाकून ९०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला ताब्यात घेतले आहे. तालुका पोलिसांनी ही कारवाई काल रात्री केली.
संगमनेर तालुक्यातील निमज परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरून विक्री होत असल्याची माहिती तालुका पोलिसांना समजली. तालुका पोलिसांनी काल रात्री छापा टाकला असता या ठिकाणी गांजाची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले पोलिसांनी अमोल आडांगळे वय ३५ रा. निमज संगमनेर याच्याकडे चौकशी केली असता तो गांजाची बेकायदेशीर विक्री करत असल्याचे समजले. पोलिसांनी त्याच्याकडून ९०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे.
ही दमदार कामगिरी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शलमोन सातपुते, पो. ना. सचिन उगले यांनी केली रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गांजाची सर्रास विक्री केली जात आहे पोलिसांनी मुख्य गांजा विक्रेत्यास अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
Web Title: Ganja seized from Sangamner taluka; Police raid
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study