चक्क! दुधाच्या पिकअप मध्ये गावठी दारू
Breaking News | Pune Crime: पोलीसांकडून नाकाबंदी दरम्यान दुधाची वाहतुक करणार्या पिकअप मध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा पकडून अंदाजे ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली.
ओतूर ता. जुन्नर: येथील पोलीसांकडून नाकाबंदी दरम्यान दुधाची वाहतुक करणार्या पिकअप मध्ये गावठी हातभट्टीचा दारूसाठा पकडून अंदाजे ४ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक एल.जी. थाटे यांनी दिली. ओतूर पोलीसांकडून आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नगर-कल्याण महामार्गावर खुबी येथे नाकाबंदी चालू असून त्यादरम्यान बुधवारी ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत दत्तात्रय शिवाजी काळे, वय ५०, रा. पिंपळवंडी ता. जुन्नर, पूणे यशवंत गुना रढे व रमेश पुनाजी कारभळ, दोघे रा. सावरणे ता. मुरबाड, जि. ठाणे, सुभाष बाबुराव नवले, रा. पारगाव, ता. जुन्नर, जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सरकारतर्फे फिर्याद पोलीस कर्मचारी संदीप भोते यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओतूर पोलीसांकडून आदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर नगर- कल्याण महामार्गावर खुबी येथे नाकाबंदी चालू आहे. त्यादरम्यान बुधवारी सकाळी दहा वाजेदरम्यान कल्याण कडून नगर कडे जाणाऱ्या दूध वाहतुकीचे पॅक बॉडी असलेली पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी क्रमांक एम. एच.१४ एच. यू. ८७६४ ही गाडी संशयित वाटल्याने पोलीस कर्मचारी संदीप भोते, सुभाष केदारी व इतर सहकारी यांनी अडवून कसून तपासणी केली असता सदर गाडीमध्ये ट्यूब मध्ये गावठी हातभट्टी दारू मिळून आली. यावेळी पिकअप चालक दत्तात्रय काळे यास विचारणा केली असता त्याने गावठी हातभट्टीची दारू ही यशवंत रढे व रमेश कारभळ यांचे कडून सावरणे ता. मुरबाड येथून आणून पारगाव (जुन्नर) येथील सुभाष नवले यांच्याकडे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. त्यानंतर या सर्वावर ओतूर पोलीसात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, कलम ६५(अ) (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Gavathi liquor in milk pickup
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study