अहिल्यानगर: गावठी पिस्तुलासह तिघे अटकेत
Breaking News | Ahilyanagar: एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त.
नगर : शहरात लगत असणाऱ्या भुईकोट किल्ल्याजवळ दुचाकीवर फिरणाऱ्या तिघा संशयितांना भिंगार कॅम्प पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त केले. अनिस जाकीर शेख, अवेज फकीर मोहम्मद सय्यद, सोहेल युनुस शेख (तिघे रा. रामवाडी, सर्जेपुरा, ता. जि. अहिल्यानगर) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिस कॅम्प पोलिस शनिवारी रात्री पेट्रोलिंग करीत असताना रात्री बारा वाजता केंद्रीय विद्यालय व भुईकोट किल्ल्याजवळ विना क्रमांकाच्या दुचाकीवर फिरताना दिसले. पोलिसांना पाहताच त्यांनी पळ काढला. पोलिस पथकाने पाठलाग करून तिघांना पकडले. दुचाकीच्या डिक्कीतून एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतूस जप्त केले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगीर, उपनिरीक्षक योगेश शिंदे, चंद्रकांत माळोदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल दीपक शिंदे, रवी टकले, रघुनाथ कुलांगे, पोलिस कॉन्स्टेबल समीर शेख, प्रमोद ल्हारे, अमोल आव्हाड, वैभव झिने यांच्या पथकाने केली.
Web Title: Gavathi three arrested with pistol
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study