Home महाराष्ट्र संतापजनक घटना! वडापाव खायला दिला अन् अत्याचार केला

संतापजनक घटना! वडापाव खायला दिला अन् अत्याचार केला

Mumbai Crime News: एका तरुणाने वडापाव खाऊ घालण्याचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

Gave them vada pav and abused them

मुंबई : वसई परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. इथे एका तरुणाने वडापाव खाऊ घालण्याचे अमिष दाखवत एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नायगांव पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

नूर अली छोटे मियां असं आरोपी तरुणाचं नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर पायी चालत आपल्या घरी चालली होती. यावेळी आरोपीनं पीडितेचा रस्ता अडवला. उन्हात चालत कशाला जातेय. दुकानात येऊन थोडा आराम कर, असं सांगितलं. यानंतर आरोपीनं पीडित मुलीला वडापाव खायला देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं अत्याचाराची माहिती कुणाला देऊ नको, अशी धमकी दिली.

आरोपीच्या धमकीला घाबरून पीडित मुलीनं या घटनेची कुठेच वाच्यता केली नाही. मात्र अलीकडेच पीडित मुलीचं पोट दुखू लागलं. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. यावेळी डॉक्टरांनी पीडितेची तपासणी केली असता, ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं. यानंतर पीडितेनं तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला.

मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी नायगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. शाळेतून घरी जाणाऱ्या मुलीला वडापाव खायला देऊन अशाप्रकारे अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक तपास नायगाव पोलीस करत आहेत.

Web Title: Gave them vada pav and abused them

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here