Home क्राईम प्रेमसंबंधात फसवणूक; मुलीसह आईची आत्महत्या

प्रेमसंबंधात फसवणूक; मुलीसह आईची आत्महत्या

Satara Crime: प्रेमसंबंधात फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाला नकार दिल्याने मुलीसह तिच्या आईने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Girl commits suicide along with her mother after refusing to marry

फलटण |सातारा: प्रेमसंबंधात फसवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून लग्नाला नकार दिल्याने  मुलीसह तिच्या आईने आत्महत्या  केल्याची घटना फलटण तालुक्यातील न पवारवाडी येथे घडली आहे. या प्रकरणी दोघींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यांतर्गत फलटण ग्रामीण पोलिसांत पती-पत्नीसह त्यांच्या मुलावर गुन्हा – दाखल करण्यात आला आहे.

सुखदेव मिंड, राधा सुखदेव मिंड, गणेश सुखदेव मिंड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित मुलीच्या मामाने फिर्याद दिली आहे. सुखदेव मिंड, त्यांची पत्नी राधा यांना फिर्यादीची भाची पीडित ही अल्पवयीन आहे, हे माहीत असतानाही त्यांनी त्यांचा मुलगा गणेश याला तिला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध निर्माण करण्यास सांगितले. त्यातून गणेशने गुरुवारी (दि. २१) पीडितेला फूस लावून फलटणला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. ही बाब पीडितेने आईला सांगितली. त्यानंतर त्या दोघींनी शुक्रवारी (दि. २२) सकाळी पवारवाडी गावात आपल्या शेतातील विहिरीमध्ये उड्या मारून आत्महत्या केली आहे. दरम्यान, याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुखदेव मिंड, राधा मिंड व गणेश मिंड यांच्या व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रानगट तपास करत आहेत.

Web Title: Girl commits suicide along with her mother after refusing to marry

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here