आश्रमशाळेतील विद्यार्थिनीची गळा चिरून हत्या
Crime News: आश्रमशाळेत शिकणाऱ्या युवतीची आरोपीने कोयत्याने गळा चिरून हत्या (Murder) केल्याची घटना.
मोखाडा |पालघर : मोखाडा शहरात गभालपाडा आश्रमशाळेत शिकणाऱ्या युवतीची आरोपीने कोयत्याने गळा चिरून हत्या केली. अर्चना उदार (वय १८, रा. पिंपळपाडा) असे मृत युवतीचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर पालकवर्गात चिंतेचे वातावरण तयार झाले असून, आश्रमशाळांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्राथमिक तपासादरम्यान ही घटना एकतर्फी प्रेमप्रकरणातून झाल्याचा अंदाज असून, आरोपी प्रभाकर वाघरे (२२) फरार आहे.
गभालपाडा येथे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आहे. सकाळी मुली वर्ग संपवून जेवण्यासाठी आश्रमशाळेकडे येत असताना प्रभाकर याने अर्चना हिला गाठले आणि धारदार कोयत्याने गळा चिरून तिची हत्या केली.
Web Title: A female student in an ashram school was Murder by slitting her throat
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App