Home Ahmednagar Live News लग्नास नकार, तरुणीचे अपहरण करून दीड महिना वारंवार बलात्कार  

लग्नास नकार, तरुणीचे अपहरण करून दीड महिना वारंवार बलात्कार  

girl was abducted and repeatedly rape for a month and a half

अहमदनगर | Rape Case: मुलीच्या वडिलांनी लग्नास नकार दिल्यामुळे दोन तरुणांनी राहुरी येथील एका १८ वर्षीय तरुणीचे अपहरण करून १९ जून ते २४ जुलै या दरम्यान तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याची घटना राहुरी तालुक्यातील चेडगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी पिडीत तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दि. १९ जून ते २४ जुलै दरम्यान पिडीत तरुणी तिच्या घराजवळील ओढ्याने तिच्या आईकडे जात असताना चेड्गाव ब्राम्हणी जाणाऱ्या कच्चा रस्त्यावरून आरोपींनी त्या मुलीचे तोंड दाबून तिला उचलून मोटारसायकलवर बसवून अपहरण केले. त्यांनतर नगर तालुक्यातील केडगाव येथील एका रूमवर तिला नेण्यात आले. सदर मुलीच्या वडिलांनी आरोपीबरोबर लग्न लावून देण्यास नकार दिल्याने याचाच मनात राग धरून आरोपींनी त्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. दीड महिना त्या मुलीस रूममध्ये डांबून ठेवले. व तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला.

पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी रवींद्र शंकर बर्डे रा. गोरेगाव ता. पारनेर व त्याचा मित्र अनिल नावाचा तरुण आणि रवींद्र बर्डे याची चुलत बहिण ज्योती नामक रा. केडगाव या तिघांवर अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: girl was abducted and repeatedly rape for a month and a half

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here