अहमदनगर: पेपर देण्यासाठी गेलेल्या मुलीला पळविले
Breaking News | Ahmednagar: मुलगी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी गेली असता, तिला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच समोर आला.
श्रीरामपूर : तालुक्यातील एका परिसरात राहणारी मुलगी इयत्ता दहावीचा पेपर देण्यासाठी गेली असता, तिला पळवून नेण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील एका परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी नेवासा तालुक्यातील एका ठिकाणी शिक्षण घेत होती. दहावीचे पेपर असल्याने ती श्रीरामपूर येथून सकाळी नेवासा येथे जाण्यासाठी बसने गेली असता, तिला कोणीतरी अज्ञात आरोपीने फूस लावून पळवून नेले आहे. मुलगी शिकत असलेल्या शाळेमधील मुख्याध्याकांनी मुलीच्या आईला फोन करून तुमची मुलगी १० वीच्या पेपरला का आली नाही? असे विचारल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मुलीच्या आईने येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.
Web Title: girl who went to give the paper was abducted
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study