फुटबॉल आणण्यासाठी झुडपात गेलेल्या मुलीवर अत्याचार, धक्कादायक घटना
Breaking News | Pune Crime: बॉल झुडपात गेला. तो शोधण्यासाठी झुडपात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केल्याची घटना. पीडिता ही २८ महिन्यांची गर्भवती.
पुणे : फुटबॉल खेळत असताना बॉल झुडपात गेला. तो शोधण्यासाठी झुडपात गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने बलात्कार केला. पीडित मुलगी २८ आठवड्यांची गर्भवती राहिल्याने ही बाब समोर आली. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
मुकेश कुमार मुखिया (२२, रा. डिफेन्स कॉलनी, लुल्लानगर, वानवडी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत घटनेच्या वेळी अल्पवयीन असलेली आणि सध्या अठरा वर्षे असलेल्या तरुणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत माहिती अशी की, सहा महिन्यांपूर्वी पीडिता अल्पवयीन असताना ती मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना बॉल मैदानाशेजारील झुडपात गेला. पीडिता बॉल शोधण्यासाठी झुडपात गेली. त्यावेळी तेथे आलेला मुकेश तिच्या पाठोपाठ झुडपात गेला. तेथेच त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.
दरम्यान, पीडिता ही गर्भवती असल्याचा प्रकार तिच्या घरच्यांच्या लक्षात आल्यानंतर चौकशीमध्ये तिने मुकेश याने अत्याचार केल्याचे सांगितले. त्याने केलेल्या अत्याचाराने सध्या पीडिता ही २८ महिन्यांची गर्भवती असून आरोपीवर बलात्कार, तसेच बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: girl who went to the bush to fetch a football was abused
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study