इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मैत्रिणीवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Breaking News | Chhatrapati Sambhajinagar Crime: इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस.
छत्रपती संभाजीनगरः इन्स्टाग्रामवर भेटलेल्या मैत्रिणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच तिच्यावर अत्याचार (abused) केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे तर तिचा गर्भपात करून लग्नाला नकार देणाऱ्या तरूणांविरोधात मुकुंदवाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विनय गायकवाड (रा. सिडको, एन ६) असे आरोपीचे नाव आहे. याविषयी प्राप्त माहिती अशी की, तक्रारदार महिला आणि आरोपीची इन्स्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघे परस्परांना भेटू लागले. विनय तिला फिरायला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला नेत असत. २९ मार्च रोजी धुलिवंदन सणानिमित्त आरोपीने तिला बळजबरीने मद्यपान करण्यास सांगितले. यानंतर तो तिला मुकुंदवाडी रेल्वे गेट नंबर ५६ जवळील निर्जन परिसरात घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. यानंतर तू मला फार आवडतेस, मला तुझ्यासोबत लग्न करायचे असे सांगून त्याने तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्यांच्यात अनेकदा संबंध आले. यानंतर तो तिच्यासोबत मद्यपान करायचा, पिडिता नशेत असताना तो तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. या कृत्याचा तो त्याच्या मोबाइलवर व्हिडिओ चित्रण करायचा. हे व्हिडिओ तो व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत आहे. यामुळे घाबरलेल्या पिडितने २९ जून रोजी मुकुंदवाडी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. देशमुख या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पीडितने त्याच्याकडे लग्नाचा आग्रह धरला. तेव्हा त्याने तिला खाजगी रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केला. यानंतर तिने वारंवार त्याच्याकडे लग्नासाठी आग्रह केला असता त्याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान नातेवाईकानी त्याचे दुसरूना मुलीसोबत लग्न जुळवले. हा प्रकार पीडितेला समजातच तिने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
Web Title: Girlfriend met on Instagram abused, threatened to make video viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study