Home नागपूर बलात्कार करून प्रेयसीचा गळा दाबून खून, शिबिरासाठी गेली अन…

बलात्कार करून प्रेयसीचा गळा दाबून खून, शिबिरासाठी गेली अन…

Breaking News | Nagpur Crime: बलात्कार (Raped) करून प्रेयसीचा गळा दाबून खून (Killed)  करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Girlfriend raped and strangled to death

नागपूरः बलात्कार करून प्रेयसीचा गळा दाबून खून  करण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील उमरड येथे उघडकीस आली. मृत युवती २५ वयाची असून याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

माहिती अशी की, बीए द्वितीय वर्षाला असलेली ही युवती रविवारी सकाळी नऊचे सुमारास महाविद्यालयीन शिबिरासाठी गेली होती. साडेसहा वाजता तिची आई घरी आली तेव्हा ती घरी नव्हती, आईने तिच्या मोबाईलवर संपर्क साधला असता मी ब्रह्मपुरीत आहे आज रात्री घरी येणार नाही असे तिने आईला सांगितले. त्यानंतर एका युवकाने मोबाईल घेतला मी तुमच्या मुलीला परत पाठवणार नाही असे तो म्हणाला.

दरम्यान उमरेडमधील एमआयडीसी बस थांबा परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली आढळलेल्या दस्तऐवजावरून संबधित युवतीची ओळख पटली. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आरतीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता ती एका युवकाच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी मोबाईल क्रमांकाचे लोकेशन आधारे नागपूरला शोध घेतला मात्र संबधित युवक मिळाला नाही. अखेर त्याला चंद्रपुरातून अटक करण्यात आली.

Web Title: Girlfriend raped and strangled to death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here