Home क्राईम प्रेयसीला लग्नाच्या आमिषाने सतत अत्याचार, न्यूड व्हिडीओ काढून नातेवाईकांना पाठवले अन्…

प्रेयसीला लग्नाच्या आमिषाने सतत अत्याचार, न्यूड व्हिडीओ काढून नातेवाईकांना पाठवले अन्…

Solapur Crime:  प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवत १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार (Rape) करण्यात आला आहे. पानटपरीवर मिळणाऱ्या मसाला पानातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार करत तिचे न्यूड फोटो, न्यूड व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यासाठी प्रेयसीला दोन लाख रुपयांची मागणी.

girlfriend was constantly rape, took nude videos and sent them to her relatives

सोलापूर : सोलापूरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आपल्या प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवत १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.  पानटपरीवर मिळणाऱ्या मसाला पानातून गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार करत तिचे न्यूड फोटो, न्यूड व्हिडीओ काढले. हे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्यासाठी प्रेयसीला दोन लाख रुपयांची मागणी केली. प्रेयसीने दोन लाख रुपयांची रक्कम न दिल्याने प्रियकराने अखेर न्यूड फोटो आणि व्हिडीओ नातेवाईकांना पाठवले. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम गौतम शिंगे (रा. सोलापूर) असं संशयित आरोपीचं नाव आहे.

दिलेल्या फिर्यादीनुसार,  संशयित आरोपी शुभम याने पीडित तरुणीला जुलै २०२२ दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून आपल्या राहत्या घरी घेऊन गेला. त्यानंतर पानटपरीवर मिळणाऱ्या मसाला पानमध्ये गुंगीचे औषध दिले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. गुंगी आल्याने पीडित तरुणीला काही कळले नाही. संशयित आरोपी शुभमने पीडित तरूणीचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढले.

संशयित आरोपी शुभम शिंगे याने जुलै ते सप्टेंबर २०२२ दरम्यान पीडित तरूणीला तिचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ दाखवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. प्रियकराच्या सततच्या त्रासाला आणि अत्याचाराला प्रेयसी कंटाळली होती. लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत तिच्यावर अत्याचार केला आणि गुंगीचे औषध देऊन तिचे न्यूड फोटो आणि व्हिडीओ मोबाईलमध्ये काढल्याने पीडित तरुणीला जबर धक्का बसला होता.

संशयित आरोपी शुभम शिंगे याने १५ ते १८ एप्रिल २०२३ पर्यंत सर्व फोटो आणि व्हिडिओ पीडित तरूणी आणि तिच्या नातेवाईकांकडे पाठवण्याची धमकी देत दोन लाखांची मागणी केली. पण पीडित तरुणीने पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित आरोपीने ते व्हिडीओ आणि फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठवून बदनामी केली. या प्रकरणी पीडित १९ वर्षीय तरुणीने सलगर वस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीवरून शुभम शिंगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अधिक तपास सलगर वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी करीत आहेत.

Web Title: girlfriend was constantly rape, took nude videos and sent them to her relatives

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here