Ahmednagar Murder Case: चिखली घाटाच्या शेजारील जंगलात दारू पाजून कुकडी कालव्याच्या पाण्यात फेकून देऊन त्याचा खून.
श्रीगोंदा: काष्टी येथील मैत्रिणीला प्रेमसंबंध (Love) ठेवण्याच्या मागणी करणाऱ्या विश्वनाथ भापकर याला नकार मिळाल्याने त्याने थेट मैत्रिणीचे आयुष्य उधवस्त करण्याचे ठरविले. त्याने मित्राच्या मदतीने मैत्रिणीच्या भावाला श्रीगोंदा रोडवरील चिखली घाटाच्या शेजारील जंगलात दारू पाजून कुकडी कालव्याच्या पाण्यात फेकून देऊन त्याचा खून केला.
सागर झरेकर (25 वय, रा. खोसपुरी, ता. नगर) असे खून केलेल्या मृत तरूणाचे नाव आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सुनील चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, विश्वनाथ भापकर (वय 28, रा. कोळगाव ता. श्रीगोंदा) याची काष्टी येथील एका मुलीसोबत मैत्री होती. भापकर हा संबंधीत मुलीला मैत्रीचे रुपांतर प्रेमात करण्याची मागणी करत होता. मात्र, मैत्रिणीने त्यास स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने भापकर यांने मैत्रिणीचे आयुष्य उध्वस्थ करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्याचा मित्र गौरव साके (वय 20, रा. साकेवाडी) यासोबत मैत्रिणीचा भाऊ सागर झरेकर याला चिखली घाटा शेजारी असणार्या जंगलात दारू पाजून त्या जिवंतपणी कुकडी कालव्यात टाकून देत त्याचा खून केला. हा प्रकार 14 जानेवारी रोजी घडला असून स्थानिक गुन्हे शाखेने तपास केल्यानंतर नगर पोलीस ठाण्यात 2 सप्टेंबरला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Girlfriend’s brother was Murder by drinking alcohol and throwing