ब्रेकिंग! 1 कोटी 62 लाखांचे सोने चांदी जप्त
Breaking News | Pune Crime: एका वाहनातून १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने चांदी जप्त केले.
पुणे : राजीव गांधी पुलाजवळ उभारण्यात आलेल्या स्थिर पडताळणी कक्षाने आज एका वाहनातून १ कोटी ६२ लाख रुपयांचे सोने चांदी जप्त केले आहेत. या जप्त केलेल्या सोने चांदीची आयकर विभाग व जीएसटी विभागामार्फत पडताळणी करण्यात येत आहे.
मिळालेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे एम एच ४३ बी के ५८०६ हे वाहन पोलिसांनी थांबविले. वाहनचालक योगेश कुमार परमार याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्यात ४ लाख १६ हजार ६३२ रुपयांची ४ किलो ४७९ ग्रॅम चांदी आणि १ कोटी ५७ लाख ९६ हजार १२४ रुपयांचे २ किलो ५११ ग्रॅम सोन्याचे पार्सल आढळून आले. पोलिसांनी याची माहिती आयकर विभाग आणि जीएसटी विभागाला दिली असून हे वाहन चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
आयकर विभाग आणि जीएसटी विभागाकडून त्याची पडताळणी सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सोनेचांदी विविध ज्वेलर्स यांनी मागविले आहेत. त्याची कुरिअरमार्फत पुणे, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पोहोच करायचे आहेत. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई केली जात आहे.
Web Title: Gold and silver worth 1 crore 62 lakh seized
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study