Home Sangamner News संगमनेरात दोन सोनसाखळी चोरणारे गजाआड, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

संगमनेरात दोन सोनसाखळी चोरणारे गजाआड, सात लाखांचा मुद्देमाल जप्त

gold chain theft arrested in Sangamner

Ahmednagar | संगमनेर | Sangamner Theft: संगमनेर शहर व तालुक्यातील सोनसाखळी चोरांची मोठी टोळी कार्यरत असून पायी जाणाऱ्या महिलांचे गळ्यातून दागिने ओरबाडण्याच्या घटना अनेक वेळा घडल्या आहेत. बुधवार दिनांक ९ रोजी तालुक्यातील वडगाव पान शिवारात घडलेल्या सोन साखळी प्रकरणातील आरोपींना गजाआड करून उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व तालुका पोलिसांनी सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बुधवारी तालुक्यातील वडगाव पान येथील सौ. किशोरी अमित लोंढे या स्वामी समर्थ केंद्रातून दुर्गा सप्तशतीचा कार्यक्रम संपवून संगमनेर ते लोणी रोडने पायी घरी येत होत्या. यावेळी दोन अज्ञात युवकांनी या महिलेस धक्का देऊन खाली पाडून सोन्याचे मंगळसूत्र चोरून (Theft) त्यांच्याकडील पल्सर मोटारसायकलवरून लोणीच्या दिशेने पोबारा केला. मात्र ग्रामस्थांनी या चोरट्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

याबाबत फिर्याद सौ. लोंढे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सोनू उर्फ भैरव विश्वनाथ पवार वय २२  रा. नारायणगाव ता.सिन्नर जि. नाशिक अविनाश देविदास केंधळे वय २७ रा. नारायणगाव ता.सिन्नर जि. नाशिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता संगमनेर शहर, पिंपळगाव बसवंत, मान्होरी गाव, विंचूर येथे चोरीचे (theft) गुन्हे केल्याचे कबुली दिली आहे. त्यानुसार आरोपींकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Web Title: gold chain theft arrested in Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here