Home Crime News दारूच्या नशेत आईवर बलात्कार करणाऱ्या विकृतीला आजन्म कारावासाची शिक्षा

दारूच्या नशेत आईवर बलात्कार करणाऱ्या विकृतीला आजन्म कारावासाची शिक्षा

Gondia Crime : महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एका व्यक्तीने मागील वर्षी ऑगस्टमध्ये दारूच्या नशेत स्वतःच्या आईवर बलात्कार केला होता. या संतापजनक दुष्कृत्याबद्दल न्यायालयाने त्या विकृतास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या प्रकरणी तातडीने सुनावणी करतान आरोपीला वर्षभरात दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे.

जिल्हा व सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी सूनवलेल्या शिक्षेनुसार त्या व्यक्तीला आता त्याचं उर्वरित आयुष्य कारागृहात काढावं लागणार आहे. त्याचबरोबर दोन हजार रुपयांचा कायदेशीर दंड आणि पीडित आईला दोन लाख रुपयांची भरपाई देण्यास सांगितले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील रावणवाडी पोलिस स्थानकात या प्रकरणाचा तपास केला गेला. काही दिवसांपूर्वी १९ जानेवारी रोजी न्यायालयात सर्व पुरावे तपासण्यात आले होते. तर २४ जानेवारी रोजी त्यावर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला. यानंतर ३१ जानेवारी रोजी या प्रकरणावर अंतिम सुनावणी झाली, अशी माहिती एका अधिकाऱ्याकडून देण्यात आली होती.

Web Title : Gondia Crime : Punishment for life imprisonment for raping mother under the influence of alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here