Home भारत नशिबच! चिकन आणायला गेला आणि १२ कोटींचा मालक बनला

नशिबच! चिकन आणायला गेला आणि १२ कोटींचा मालक बनला

Good luck! He went to fetch chicken and became the owner of 12 crores

तिरुअनंतपुरम : कोणाचं नशीब कुठे आणि केव्हा बदलेल, हे कोणीच सांगू शकत नाही. केरळमधील एका व्यक्तीबाबतीत अगदी असंच काहीसं झालं आहे. सदानंद यांनी ख्रिस्मस आणि न्यू ईअरचं बंपर लॉटरी तिकिट खरेदी केलं आणि याच तिकीटाने त्यांचं नशीबच पालटलं.

सदानंद सकाळी चिकन खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेले असताना त्यांनी हे तिकिट खरेदी केलं. दुपारी जेव्हा याचा निकाल लागला तेव्हा समजलं की आपण घेतलेल्या तिकिटामुळे आपण 12 कोटी रुपये (12 Cr lottery) जिंकले आहेत. सदानंद हे केरळच्या कोट्टायम येथील कुडयामपडी येथील रहिवासी आहेत. त्यांनी जिंकलेल्या लॉटरीच्या तिकिटाचा नंबर XG 218582 असा होता. लॉटरी विभागाने सात लाखांपेक्षा जास्त तिकिटे छापली होती. लॉटरी विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतांश तिकिटे विकली गेली होती.

सदानंद आणि त्यांचं कुटुंब कुडयामपडी येथे एका छोट्याशा घरामध्ये वास्तव्यास आहे. गेल्या 50 वर्षांपासून ते पेंटर म्हणून काम करतात. सदानंद यांनी सांगितलं की, त्यांच्यावर बरंचस कर्ज आहे आणि आपल्या मुलांसाठी देखील त्यांना बऱ्याच गोष्टी करण्याची इच्छा आहे. आता 12 कोटी रुपयांची अमाप रक्कम त्यांना मिळाल्याने एका रात्रीत नव्हे तर काहीच तासांत त्यांचे आणि कुटुंबियांचे नशीबच पालटले आहे.

Web Title : Good luck! He went to fetch chicken and became the owner of 12 crores

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here