Home Maharashtra News “संजय राऊत बावचळले आहेत” – गोपीचंद पडळकर यांच टीकास्त्र

“संजय राऊत बावचळले आहेत” – गोपीचंद पडळकर यांच टीकास्त्र

Sanjay Raut

Sanjay Raut : सुपरमार्केट आणि मॉलमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय 27 जानेवारी रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. एक हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकारमानाचे सुपरमार्केट किंवा स्टोअरमध्ये स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपनं आक्रमक भुमिका घेतली आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकीबाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट’ झालं आहे. जे आजपर्यंत कधी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना भोगावे लागले नाही. ते महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भोगावे लागले. गावच्या गाव अंधारात लोटली गेली आहेत. ऐन कापणीच्या हंगामात वीज कापली गेली. त्यांच्यावर बळाचा वापर करण्यात आला. अशी सडेतोड टीका पडळकर यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

“राज्यात पेट्रोल-डिझेल ऐवजी दारू स्वस्त, दारूबंदी संपवून दारूविक्रीला परवानगी, महाराष्ट्रात नवीन दारूविक्री परवाने देण्याचा निर्णय आणि आता थेट सुपरमार्केटमधून वाईन विक्री. महाराष्ट्राला मदयराष्ट्र करण्याचा हा प्रकार खपवून घेणार नाही.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी देखील केली होती.

Web Title : Gopichand Padalkar criticizes Sanjay Raut over wine sale case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here