Home Accident News Accident: कार मोटारसायकल अपघातात आजोबा नातवाचा मृत्यू

Accident: कार मोटारसायकल अपघातात आजोबा नातवाचा मृत्यू

Grandfather's grandson dies in car-motorcycle accident

नेवासा | Accident: शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे कार मोटारसायकल अपघातात नेवासा तालुक्यातील सौंदळा येथील आजोबा नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

वरूर ता. शेवगाव येथून सौंदळा येथे जात असताना भातकुडगाव फाटा शेजारच्या दत्त पाटी येथे दुचाकीला समोरून येणाऱ्या स्विफ्ट कारने जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील ६ वर्षाच्या नातवासह आजोबाचा मृत्यू झाला आहे. तर आजी जबर जखमी झाली आहे.

या अपघातात दुर्योधन भालचंद्र आरगडे (वय ५३) रा. सौंदाळा, ता. नेवासा तर नातू प्रथमेश प्रमोद आरगडे (वय ६) तर आजी मिनाबाई दुर्योधन आरगडे (वय ४८) या जखमी झालेल्या आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील दुर्योधन भालचंद्र आरगडे हे शुक्रवार दि.२३ जुलै रोजी नातू व पत्नीसह वरुर येथे मुलीला भेटण्यासाठी आले होते . मुलीला भेटून ते दुपारी ४ वाजेच्या सुमारास शेवगाव-नेवासा रोडने आपल्या सौदाळा गावी दुचाकीवरून चालले असताना भातकुडगाव लगत असलेल्या दत्तपाटी येथून चालले असतांना समोरुन येणाऱ्या स्विफ्ट कारने समोरून धडक दिली जखमींना शेवगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.. पोलिसांनी सायंकाळी घटनास्थळी जाऊन स्विफ्ट कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Grandfather’s grandson dies in car-motorcycle accident

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here