अकोलेतील त्या बड्या नेत्याचा अखेर शिंदे शिवसेनेत प्रवेश! साहेब, दादा, भाऊंना एकत्रच झटका
Breaking News | Akole Politics: अकोले नगरपंचायतीचे 14 आजी माजी नगरसेवक यांच्यासह विविध सहकारी संस्थेतील संचालक, ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शनिवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.
अकोले | अहिल्यानगर : आदिवासी बहुल मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघातील ठाकर समाजाचे नेते, अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मेंगाळ यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे 60 आजी-माजी सरपंच, अकोले नगरपंचायतीचे 14 आजी माजी नगरसेवक यांच्यासह विविध सहकारी संस्थेतील संचालक, ठाकरेंची शिवसेना, भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शनिवारी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले आहे. यावेळी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत महाविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला.
सकाळी अकोले शहरातून शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते ठाण्याकडे रवाना झाले. त्यामुळे उद्धव ठाकरे, शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजेच साहेब, भाऊ, दादा अशा सर्वांनाच उपमुख्यमंत्री एकनाथ ‘भाई’ शिंदे यांनी चांगलाच झटका दिला असल्याची जोरदार चर्चा अकोल्यात रंगली आहे.
शिवसेना एकसंघ असताना अकोले तालुक्यात शिवसेनेची मोठी ताकद होती आणि त्यावेळेस मारुती मेंगाळ अकोले पंचायत समितीचे उपसभापती राहिले आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे शिवसेनेची ताकद अकोल्यात कमी झाल्याचे दिसून आले मात्र मारुती मेंगाळ यांच्या सेना प्रवेशामुळे शिवसेना अकोल्यात उभारी येईल अशी चर्चा आहे.
विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सहकारी संस्थांमधील आजी-माजी संचालक नगर पंचायत समिती माजी नगरसेवक आणि जवळपास 60 ग्रामपंचायतींचे आजी-माजी सरपंच आणि शेकडो कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. या कार्यकर्त्यांमध्ये माजी आमदार पिचड आणि विद्यमान आमदार लहामटे यांचे कार्यकर्ते सुद्धा असल्याचा दावा मेंगाळ यांनी केलाय. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन आणि अकोले तालुक्याच्या विकासासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया मारुती मेंगाळ व त्यांच्या समर्थकांनी दिली आहे.
Breaking News: great leader from Akole finally joined Shinde Shiv Sena