Home संगमनेर गुंजाळवाडी ग्रामपंचायत: इतके टक्के झाले मतदान, आज निकाल

गुंजाळवाडी ग्रामपंचायत: इतके टक्के झाले मतदान, आज निकाल

Gunjalwadi Grampanchayat Election: एकूण ७८ टक्के मतदान.

Gunjalwadi Grampanchayat Election polling

संगमनेर: गुंजाळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मोठी लढत होत आहे. गुंजाळवाडी ग्रामपंचायत आपल्या ताब्यात याव्यात यासाठी आजी माजी महसूलमंत्र्यांकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. काल  सकाळी साडे सात ते साडे पाच या दरम्यान मतदान व्यवस्थितपणे पार पडले. गुंजाळवाडी गावात एकूण ७८ टक्के मतदान झाले असून आज मतमोजणी होणार आहे.  सरपंच पद हे जनतेतून थेट निवडून येणार आहे. थोरात गटाकडून गुंजाळ अमोल (नरेंद्र) संभाजी तर विखे गटाकडून गुंजाळ रोहिदास रेवजी तसेच गुंजाळ योगेश बाळासाहेब यांच्यात थेट लढत आहे. या ग्रामपंचायतीत एकूण ३७ सदस्यांचे भवितव्य काल मत पेटीत बंद झाले असून आज निकाल जाहीर होणार आहे.  त्यामुळे या निकालानंतर कोणाची दिवाळी आणि कोणाचे दिवाळे निघणार हे स्पष्ट होणार आहे.

संगमनेर तालुक्यातील गुंजाळ वाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या एका जागेसाठी तर सदस्यपदाच्या १५ जागांसाठी ६ हजार ८०७ मतदारांपैकी ५३५९ सरासरी ७८ टक्के मतदान झाले आहे.

वार्डनुसार मतदान:

वार्ड: १  एकूण मतदान ११३५ झालेले मतदान १००२  टक्केवारी ८८.२८

वार्ड: २  एकूण मतदान १३७२  झालेले मतदान ११८६   टक्केवारी ८६.४४

वार्ड: ३   एकूण मतदान ११११  झालेले मतदान ८४०   टक्केवारी ७५.६०

वार्ड: ४   एकूण मतदान १६५८  झालेले मतदान १०८६   टक्केवारी ६५.५०

वार्ड: ५   एकूण मतदान ११०९  झालेले मतदान ८५८  टक्केवारी ७७.३६

वार्ड: ६   एकूण मतदान ४२२  झालेले मतदान ३८७   टक्केवारी ९१.७०

एकूण मतदान टक्केवारीत: ७८.००

Web Title: Gunjalwadi Grampanchayat Election Polling

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here