Raid: गुटख्यावर छापा: दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त
Shrirampur | श्रीरामपूर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीरामपुरात सूतगिरणी फाट्यावर घरात गुटख्याची साठवणुक करून विक्री करत असणाऱ्या ठिकाणी छापा (raid) टाकून दीड लाखाचा हिरा गुटखा जप्त केला. या प्रकरणी तिघांवर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी मोईज मुनिर पठाण, त्याचे वडील मुनिर अब्बास पठाण (दोघे रा. सुतगिरणी, श्रीरामपुर) व शाहरूख मजीदखान पठाण (रा. अशोकनगर ता. श्रीरामपुर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोईज पठाण व मुनिर पठाण हे दोघे बाप-लेक त्यांच्या घरात गुटख्याची साठवणुक करून विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, रणजीत जाधव, रोहीत येमुल, सागर ससाणे, लक्ष्मण खोकले यांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांच्यासह नमुद ठिकाणी जावुन छापा (Raid) टाकला. या ठिकाणी 1,20,000 रु. किमतीच्या पांढर्या रंगाच्या 10 गोण्यांमध्ये एकूण 1000 हिरा पान मसाला गुटखा कंपनीचे पुडे, प्रत्येकी किंमत 120 रु. तसेच 30,000 किमतीचे निळया रंगाचे 10 गोण्यांमध्ये एकूण 1000 रॉयल 717 तंबाखूचे पुडे प्रत्येकी किंमत 30 रु. पुडा प्रमाणे असा 1,50,000 रु किमतीचा हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आला.
घरामध्ये हिरा कंपनीचा पानमसाला गुटखा तसेच रॉयल 717 नाव असलेले तंबाखुचे पांढर्या रंगाच्या गोण्यामध्ये मिळुण आल्याने पोलिसांनी तो जप्त केला आहे.
Web Title: Gutkha raid One and a half lakh diamond gutkha seized