Home क्रीडा ऑस्ट्रेलियाच्या Big Bash League मध्ये खेळणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय क्रिकेटर

ऑस्ट्रेलियाच्या Big Bash League मध्ये खेळणारा ‘हा’ ठरला पहिला भारतीय क्रिकेटर

Unmukt Chand BBL

BBL 2022 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश या जगप्रसिद्ध क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पहिल्या वहिल्या खेळाडूने आज आपले नाव कोरले. १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाला वर्ल्डकप मिळवून देणारा उन्मुक्त चंद (Unmukt Chand) हा ही स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. मेलबर्न रेनिगेड्स संघाकडून त्याने आज या स्पर्धेचा पहिला सामना खेळला.

भारताच्या ‘आयपीएल’ नंतर ऑस्ट्रेलियाची ‘बिग बॅश लीग’ जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र BCCI इतर देशांतील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारतीय खेळाडूंना खेळण्याची अनुमती देत नसल्याने कोणताही भारतीय खेळाडू या स्पर्धेत दिसला नाही. मात्र उनमुक्त चंदने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या स्वप्नासाठी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आहे. लवकरच तो अमेरिकेच्या संघातून खेळतानाही दिसेल. BCCI सोबत कोणतेही संबंध नसल्याने चंदने रेनिगेड्स संघाशी करार केला.

आज ‘मेलबर्न रेनिगेड्स’ कडून खेळताना ‘हॉबर्ट हुरीकेन’ विरुद्ध झालेल्या लढतीत १८३ धावांचा पाठलाग करताना चौथ्या क्रमांकावर चंदने फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी करण्यात उनमुक्त चंद मात्र अयशस्वी ठरला. आठ चेंडूंचा सामना करीत त्याने सहा धावा काढल्या. मात्र अठराव्या षटकात खेळत असल्याने दबावाखाली येऊन संदीप लेमीचानेच्या गोलंदाजीवर सेलेब ज्वेलच्या हाती झेल देऊन तो तंबूत परतला.

उनमुक्त चंदने भारताच्या मुख्य संघात आपला खेळ केलेला नसून आयपीएल मध्ये त्याने काही सामने खेळले आहेत. आयपीएल मध्ये त्याने २१ सामन्यांत एका अर्धशतकासह ३०० धावा केल्या आहेत. दिल्ली डेअरडेविल्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी त्याला आपल्या ताफ्यात सामील केले होते.

Web Title : Ha became the first Indian cricketer to play in Australia’s Big Bash League

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here