तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह, हत्या की आत्महत्या
नागपूर | Nagpur: नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्यांतर्गत सुराबर्डी येथील निर्जनस्थळी 22 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहाने खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी पेट्रोलची रिकामी बाटली आढळल्याने आधी तिची हत्या करून नंतर तिला जाळलं असावं, असा अंदाज व्यक्त केला जात होता.
निकिता चौधरी (वय 22) असे या तरुणीचे नाव असून ती राणाप्रतापनगर पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी असल्याचे समजते.
सुराबर्डी परिसरात 22वर्षीय तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह काल रात्री आढळून आला. वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्जनस्थळी हा मृतदेह आढळून आला. तरुणीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. प्रथमदर्शनी तिची हत्या (Murder) झाली असावी, असा संशय व्यक्त केला जात होता. मात्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात तरुणीची हत्या झाली नसून तिने स्वतः आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. याबाबत शहर पोलीस आयुक्त यांनी माहिती दिली आहे.
सदर तरुणी गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती मिळत आहे. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती मंगळवारी बेपत्ता झाली होती. त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यावरून तरुणीची हत्या झाली नाही. तिने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच याबाबत अंतिम निष्कर्षावर जाता येईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे.
Web Title: Half-burnt body of a young woman, murder or suicide