Home नाशिक जिवाला धोका असल्याचा मेसेज पाठवत घेतला गळफास, आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी….

जिवाला धोका असल्याचा मेसेज पाठवत घेतला गळफास, आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी….

इगतपुरीतील हॉटेल कर्मचाऱ्याची आत्महत्या (Suicide).

hanged for inciting suicide by sending messages threatening his life

इगतपुरी: शहरातील तळेगाव शिवारात मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलमधील कर्मचाऱ्याने गळफास घेत शनिवारी (दि. १९) आत्महत्या केली. याप्रकरणी इगतपुरी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत संबंधित हॉटेल मालकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या नातेवाइकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महामार्गाच्या जवळ असलेल्या इगतपुरी येथील एका हॉटेलमधील रूममध्ये हॉटेल कर्मचारी आनंदा निवृत्ती दोंदे (वय २४, रा. टिटोली शिवार, इगतपुरी) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी या युवकाने माझ्या जिवाला धोका आहे असा मेसेज पाठविला होता, तसेच मोबाइलवरून पत्नी, नातेवाईक व मित्रांशी संपर्क केला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक सुनील भामरे यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आनंदा दोंदे यास रुग्णवाहिकेद्वारे इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सतीश बाळू दोंदे (वय २७, रा. तळेगाव ) यांनी फिर्याद दाखल केली असून, पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे तपास करीत आहेत.

आनंदाने पगाराची थकीत रक्कम हॉटेल मालकाकडे मागितली असता, मालकाने पैसे देण्यास नकार देत, जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच अतिरिक्त काम करण्यास भाग पाडून त्यास आत्महत्येस प्रवृत्त केले, असे नातेवाइकांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: hanged for inciting suicide by sending messages threatening his life

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here