Home Crime News संगमनेर: पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा – Crime

संगमनेर: पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ, चौघांवर गुन्हा – Crime

Sangamner Crime:  माहेरून दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा.

Harassment of married woman to bring money, crime against four

संगमनेर: जागा घेण्यासाठी विवाहितेने माहेरून दीड लाख रुपये आणावेत या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षदा सोमनाथ जाधव (वय 2, रा. शिबलापूर-पानोडी, खोडकदरा, ता. संगमनेर, हल्ली राहणार, साईबन कॉलनी, संगमनेर) ही विवाहिता पानोडी येथे सासरी नांदत असतांना तिने माहेरुन जागा घेण्यासाठी दीड लाख रुपये आणावेत, या कारणासाठी तिचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. अखेर त्रासाला कंटाळून सदर विवाहितेने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी फिर्यादीचा पती सोमनाथ दामोधर जाधव, सासू पुष्पा दामोधर जाधव, सासरा दामोधर मुरलीधर जाधव, दीर अमोल दामोधर जाधव (रा. पानोडी, ता. संगमनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 724/2022 भारतीय दंड संहिता 498 अ, 406, 504, 506, 323 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक धिंदळे हे करत आहे.

Web Title: Harassment of married woman to bring money, crime against four

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here