कॉलेजमधून घरी सोडतो सांगितलं, पण तिला थेट हॉटेलवरच नेलं अन..
Breaking News | Mumbai Rape Case: गर्लफ्रेंडला भुलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नागापाडा येथील एका तरूणाला अटक.
मुंबई: शहरांत दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढले असून त्यातच आता नागपाडा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गर्लफ्रेंडला भुलवून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नागापाडा येथील एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. सोहेल खान असे आरोपी तरूणाचे नाव असून तो 21 वर्षांचा आहे. त्याच्या गर्लफ्रेंडने दिलेल्या तक्रारीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत बलात्कार, विनयभंग आणि उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित तरूणीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मी तुला कॉलेजमधून घरी सोडतो असे खान याने पीडित तरूणीला सांगितले आणि तिची फसवणूक केली. मात्र घरी सोडण्याऐवजीने त्या तरू सोहेल तिला भायखळा येथील एका हॉटेलमध्ये गेला. तेथे त्याने त्या तरूणीच्या इच्छेविरुद्ध, जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तरूणीने त्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिचं काहीचं ऐकलं नाही. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ती मुलगी व आरोपी सोहेल हे दोघे काही काळापासून रिलेशनशिपमध्ये होते. आणि त्यांच्या पालकांनीही त्यांच्या लग्नासाठी होकार दिला होता. मात्र बऱ्याच काळापासून सोहेल तिच्यावर शारीरिक जवळीकासाठी दबाव टाकत होता, ती सतत विरोध करायची तरीही त्याची मागणी थांबतच नव्हती.
पीडित तरूणीच्या वडिलांची तब्येत बरी नव्हती, त्यांचा आजार बरा झाल्यावर ते दोघांचे लग्न लावून देतील, असे तिच्या घरच्यांनी सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच आरोपीने तिला हॉटेलवर नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
Web Title: He said he would drop her home from college, but he took her directly to the hotel Rape Case
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study