Home महाराष्ट्र कारागृहातून सुटताच प्रियकराने अनारकलीच्या डोक्यावर दारुची बाटली फोडली अन…

कारागृहातून सुटताच प्रियकराने अनारकलीच्या डोक्यावर दारुची बाटली फोडली अन…

Nagpur Crime: प्रियकराने (lover) प्रेयसीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून जखमी केल्याची घटना.

  he was released from jail, and the lover broke a bottle of liquor on Anarkali's head

नागपूर: कारागृहातून बाहेर येताच प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून जखमी केल्याची घटना  कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. अनारकली (वय ३५, बदललेले नाव) असे जखमीचे तर राकेश असे हल्लेखोर प्रियकराचे नाव आहे. अनारकली ही श्रमिक आहे. ती मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी असून, पतीसोबत वाद झाल्याने १२ वर्षांपूर्वी दोन मुलींसह नागपुरात आली. कळमना बाजारात श्रमिक म्हणून काम करून उदरनिर्वाह करायला लागली. १० वर्षांपूर्वी तिची राकेशसोबत ओळख झाली. तेव्हापासून दोघेही ‘लिव्ह इन’मध्ये राहायला लागले.

काही महिन्यांपूर्वी राकेशने अनारकलीच्या १६ वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केला. अनारकलीने त्याच्याविरुद्ध कळमना पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राकेशला अटक केली. न्यायालयीन कोठडीअंतर्गत तो कारागृहात गेला. अनारकली ही मुलींसोबत वेगळी राहत होती.

चार दिवसांपूर्वी राकेश कारागृहातून बाहेर आला. मंगळवारी सायंकाळी दारू पिऊन तो अनारकलीच्या घरी गेला. तिला शिवीगाळ करायला लागला. अनारकलीने त्याला फटकारले. राकेशने तिच्या डोक्यावर दारूची बाटली फोडली व पसार झाला. शेजाऱ्यांनी अनारकलीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अनारकलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून राकेशचा शोध सुरू केला आहे.

Web Title: he was released from jail, and the lover broke a bottle of liquor on Anarkali’s head

(आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here