Home अहमदनगर हेड कॉन्स्टेबलच्या पत्रानं पोलीस दलात खळबळ, प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार

हेड कॉन्स्टेबलच्या पत्रानं पोलीस दलात खळबळ, प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार

Ahmednagar News: पोलीस खात्यात एकच खळबळ, पाथर्डीचे हेड कॉन्स्टेबल यांनी प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या (Suicide) करणार असल्याचं पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं.

The head constable's letter created excitement in the police force, he will commit suicide

अहमदनगर | पाथर्डी: पोलीस दलात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधिक्षकांना निवेदन दिलं आहे. पाथर्डी पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्याच्या या पत्राने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अहमदनगरच्या पाथर्डी पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल रामनाथ भाबड यांनी प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचं पोलीस अधिक्षकांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात 11 डिसेंबरला प्रसारित झालेल्या यादीत पदोन्नती मार्कप्रमाणे आणि सिन्यॉरिटीप्रमाणे झाली नसल्याचा आरोप रामनाथ भाबड यांनी दिला आहे.

दोन दिवसात यादीत नाव समाविष्ट न झाल्यास अज्ञात ठिकाणी जाऊन आत्महत्या करणार असल्याचा इशारा हेड कॉन्स्टेबल भाबड यांनी दिला. तसेच आत्महत्याला पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचंही नमूद पत्रात केलं आहे. या पत्रामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: The head constable’s letter created excitement in the police force, he will commit suicide

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here