Home अहमदनगर शिक्षक दिन कार्यक्रमातच शिक्षिकेने घेतला अखेरचा श्वास

शिक्षक दिन कार्यक्रमातच शिक्षिकेने घेतला अखेरचा श्वास

Ahmednagar News: खुर्चीवर बसलेल्या शिक्षिका यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (Heart attack) निधन.

Heart attack teacher breathed her last during the Teacher's Day program

जामखेड | Jamkhed : ऐन शिक्षक दिन साजरा होत असताना एका शिक्षिकेचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.  आष्टी (जि. बीड) येथील अनिशा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच मंगळवारी दुपारी बारा वाजता खुर्चीवर बसलेल्या शिक्षिका सुनीता गायकवाड (वय ४८) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मयत गायकवाड या जामखेड येथील रहिवासी आहेत. जामखेड नगरपरिषदमध्ये पर्यवेक्षक असलेले राजेंद्र गायकवाड यांच्या पत्नी होत. गायकवाड या आष्टी येथील अनिशा ग्लोबल स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. मंगळवारी बाराच्या सुमारास शिक्षक दिनानिमित्त शाळेत कार्यक्रम सुरू होता. याचवेळी गायकवाड यांना हृदयविकाराचा झटका आला व त्या खुर्चीवरून खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना आष्टी शहरातील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले व त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Heart attack teacher breathed her last during the Teacher’s Day program

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here