Home अहिल्यानगर उन्हाची तीव्रता वाढली, मात्र प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याकडे दुर्लक्ष

उन्हाची तीव्रता वाढली, मात्र प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याकडे दुर्लक्ष

heat intensified, but the elementary school was neglected

अहमदनगर | Ahmednagar: नगरसह राज्यात उष्णता वाढली आहे. उष्णतेची लाट चांगलीच वाढत असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशातच  ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसभर भरविण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटना यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांची (School) वेळ बदलण्याची मागणी होत आहे. याबाबत लवकरच जिल्हा परिषद प्रशासनाला निवदेन देण्यात येणार असल्याचे शिक्षक समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पारा चढताच आहे. नगर जिल्ह्यात देखील तपमानाने 40 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील उष्णतेची लाट सांगण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे लहान मुलांच्या  आरोग्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर पत्राचे छत आहे. वाढत्या तपमानामुळे त्याठिकाणी उकाडा वाढण्याची शक्यता अधिक आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. दिवसभर शाळा सुरू राहिल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. सकाळची शाळा झाल्यास विद्यार्थी दुपारी घरी आराम करू शकतात.

Web Title: heat intensified, but the elementary school was neglected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here